Sunday, December 8, 2024
Homeराज्यडॉ. भालचंद्र कांगो यांना क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार जाहीर !

डॉ. भालचंद्र कांगो यांना क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार जाहीर !

सांगली : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा या वर्षीचा क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार, जेष्ठ कृतिशील मार्क्सवादी विचारवंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव, शेतकरी, कामगार चळवळीचे सक्रिय मार्गदर्शक  कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांना जाहीर झाला असल्याचे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ संस्थेचे ऍड.सुभाष पाटील यांना सांगितले.

आता पर्यंत हा मानाचा पुरस्कार आचार्य शांताराम गरूड, क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी,प्रा डॉ भाई एन डी पाटील, शेकाप चे जेष्ठ नेते माआमदार भाई गणपतराव देशमुख, बेळगाव चे कॉम्रेड कृष्णा मेणसे , मेधाताई पाटकर, डॉ. विकास आमटे, डॉ. अभय बंग, जेष्ठ पत्रकार पी साईनाथ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉम्रेड सिताराम येचुरी, पद्मश्री डॉ गणेश देवी यांना मिळाला आहे. 

कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो यांना 2021 चाक्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार ऍड सुभाष पाटील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ संस्था विटा जिल्हा सांगली यांनी जाहीर केला आहे. डॉ कांगो यांनी भाकप महाराष्ट्र चे 9 वर्ष राज्य सचिव, आयटक कामगार संघटना चे राष्ट्रीय उपाध्यक्ष, लोकवाड्मय गृह चे अध्यक्ष, साप्ताहिक युगांतर ते संपादक म्हणून तसेच 2011 मध्ये औरंगाबाद येथे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. 

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहीत्य संमेलन, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन, मार्क्स गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन राज्य भर आयोजन करण्यात पुढाकार घेतला आहे. विद्यार्थी दशेपासून चळवळीत झोकून देऊन पूर्णवेळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम करत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर चळवळ मध्ये सहभागी होते. 

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे भाकप राज्य सचिव असताना सहसचिव म्हणून 9 वर्ष कार्यरत होते. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून नंतर पक्षाची धुरा सांभाळत शेतकरी, कामगार, प्रागतिक साहित्यिक चळवळ  मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत.

इलेक्ट्रॉनिक मीडियावर सातत्याने श्रमिकांच्या बाजूने, धर्मनिरपेक्षता, संविधानिक भूमिका मांडत असतात. कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचार चा वारस पुढे नेणारे डॉ भालचंद्र कांगो यांना क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, किसान सभा, तमाम पुरोगामी,परिवर्तन वादी चळवळी च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य कॉम्रेड राजू देसले यांनी अभिनंदन केले आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय