Thursday, October 10, 2024
Homeक्राईमKolhapur : भरधाव कारने तरुणाला उडवले, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Kolhapur : भरधाव कारने तरुणाला उडवले, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : महाराष्ट्रात हिट अॅंड रनच्या घटना वाढत आहेत, अशात आता पुन्हा कोल्हापूर (Kolhapur)जिल्ह्यात एक हिट अॅंड रनच्या घटना घडली आहे. भरधाव वेगात आलेल्या कारने एका तरुणाला उडवल्याची घटना समोर आली असून, हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव रोहित हाप्पे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील महामार्गावर घडली. उचगावातील रहिवासी रोहित हा रात्री उशिरा घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. रोहित रस्त्यावरून जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने त्याला धडक दिली. धडक इतकी जोरात होती की रोहित काही फुटांवर उडाला. अपघातानंतर रोहित गंभीर जखमी झाला आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडला.

Kolhapur

कारचालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला, स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय