Sunday, December 8, 2024
Homeजिल्हाकोल्हापूर : सकल मराठा संघटना राजर्षी शाहू समाधी स्थळी मराठा आरक्षण प्रश्नी...

कोल्हापूर : सकल मराठा संघटना राजर्षी शाहू समाधी स्थळी मराठा आरक्षण प्रश्नी ‘आत्मक्लेश’ करणार !

कोल्हापूर  : सकल मराठा संघटना राजर्षी शाहू समाधी स्थळी मराठा आरक्षण प्रश्नी ‘आत्मक्लेश’ करणार असल्याची माहिती राजमाजा जिजाऊ ब्रिगेड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात गायकवाड समितीचा अहवाल फेटाळल्यामुळे ‘मराठा आरक्षण प्रश्नी मराठा सभा ज्यामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. याकरीता आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी कोल्हापूरातील मराठा समाजाचे काम करणाऱ्या विविध संघटना ‘आत्मक्लेश’ करणार आहेत. 

यामध्ये अ.भा.छावा मराठा संघटना, राजमाता जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा आरक्षण संघर्ष समिती, मराठा समाज संघटना, लोकराजा राजर्षी शाहू प्रतिष्ठाण, मराठा समाज सेवा संघटना, मराठा विद्यार्थी संघटना, मराठा रियासत सहभागी होणार आहेत. 

त्यामध्ये प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर ‘आत्मक्लेश’ आंदोलन नव्वद मिनिटाचे आयोजित केले आहे. 


संबंधित लेख

लोकप्रिय