Tuesday, April 23, 2024
Homeजिल्हाकोल्हापूर : दहावी आणि बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरु करावेत, विद्यार्थ्यांची शिक्षण उपसंचालकांकडे...

कोल्हापूर : दहावी आणि बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरु करावेत, विद्यार्थ्यांची शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर, 29 : दहावी आणि बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरु करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच यावेळी शिक्षण उपसंचालक सोनवणे यांनी शासन स्तरावर प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळामध्ये शाळा कॉलेज बंद असल्याने आमचे  अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.तरी आम्ही सर्व विद्यार्थी व पालक आपणास विनंती करतो की कोरनाचे सर्व नियम पाळून आमचे दहावी आणि बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरु करावेत. सध्या आमचे ऑनलाईन तास सुरू आहेत. परंतु ऑनलाइन शिकत असताना आम्हाला अनेक अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे बऱ्याच वेळेला शिक्षक शिकवत असताना मोबाईलची रेंज मिळत नाही त्यामुळे काहीवेळा नीट आवाज ऐकू येत नाही फळ्यावर लिहिलेले सुद्धा काही वेळा अस्पष्ट दिसते काही शंका असल्यास लगेच विचारता येत नाहीत शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे नीट अध्ययन होत नाही त्याच बरोबर आम्हा सर्वांच्या कडे मोबाईल उपलब्ध होत नाहीत काही काही पालकांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने ते मोबाईल घेऊ शकत नाहीत त्याच बरोबर एका घरामध्ये दोन तीन मुलं एकाच वेळी ऑनलाईन शिकत आहेत. त्या सर्व मुलांना मोबाईल मिळत नाहीत त्याच बरोबर नेट नेट पॅकचे दर सुद्धा वाढलेले आहेत. 

काही घरांमध्ये जागा कमी असल्याने ऑनलाइन शिकताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याचा आपण गांभीर्याने विचार करून कोरोना चे सर्व नियम पाळून दहावी आणि बारावीचे ऑनलाइन ऐवजी नियमित शाळेत ऑफलाइन तास सुरू करावेत. त्यासाठी विद्यार्थ्यांचे 20 -20 किंवा 25 -25 विद्यार्थ्यांच्या बॅचेस पाडून एका बेंचवर एक विद्यार्थी बसून अध्यापन करण्याची आदेश शिक्षण विभागाने सर्व शिक्षण संस्था यांना द्यावीत. जेणेकरून आमचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

सन 2020-21 च्या परीक्षा रद्द झाल्या.परंतु त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर होणार आहे.तेव्हा आपणास विनंती आहे की सन 2021-22 च्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नयेत. त्या ऑफलाइन तसेच ऑनलाईन घेतल्यास आमचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्ष 2021 22 च्या दहावी-बारावीच्या परीक्षा कोणत्याही कारणास्तव रद्द करण्याची प्रक्रिया न राबवता त्या घेतल्या पाहिजेत अशी आग्रहाची मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी श्रुती उत्तम जाधव, साक्षी रवींद्र जाधव, धिरीजा रमेश मोरे, ऐश्वर्या डोंगर, विभावरी सुतार, अजित सासणे, भाऊ घोडके, अंजुम देसाई, लहुजी शिंदे, प्रमोद पुगावकर, पंपू सुर्वे, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, शिरीष शिंदे, अशोक पोवार उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय