Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

अर्जित रजा नोंद करण्याची कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघटनेची मागणी

---Advertisement---

कोल्हापूर : अर्जित रजा नोंद करा, अशी मागणी कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.

---Advertisement---

निवेदनात म्हटले आहे की, 1 मे पासून दिनांक 13 जूनपर्यंत शांळाना सुट्टी जाहीर झाली आहे. पण जसे डाॅक्टर, पोलिस, म.न.पा. अधिकारी, म.न.पा. कर्मचारी, राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत. तसेच  कोरोना ड्युटी वर असलेले शिक्षक सुध्दा कर्तव्य बजावत आहेत, व येथून पुढेही कर्तव्य बजावत राहतील. सुट्टीत काम केलेला कालावधी अर्जित रजा म्हणून नोंदवला जातो. तरी सदर सुट्टीतील कालावधी हा अर्जित रजा म्हणून मानला जावा, व याची नोंद सर्व्हीस बुकामध्ये करण्यात यावी, अशी 

मागणी संघटनेचे बी.डी.पाटील, अनिल चव्हाण, जयसिंग देवकर, संजय चोरमारे, सुरेश जत्राटकर, जी.बी.रेलेकर, राजेश वरक, संजय संदलगेकर, बी.एस.पाटील यांनी केली आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles