Saturday, March 15, 2025

कोल्हापूर : समाजवादी प्रबोधिनीत शिवरायांना अभिवादन !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

इचलकरंजी :  छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेची कणव असलेले राजे होते. म्हणूनच आजच्या लोकशाही व्यवस्थेतही या रयतेच्या राजाचा कारभार आदर्श ठरतो. सैन्यापासून शेतकऱ्यांपर्यंत, धर्मापासून स्त्रियांपर्यंत, भाषेपासून व्यापारापर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांनी कटाक्षाने लक्ष घातले. जात पात पंथ धर्मनिरपेक्ष व्यवहार करत रयतेतील शेवटच्या माणसाला स्वराज्याचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वातील एक आदर्श राजे ठरतात असे मत प्रा. रमेश लवटे यांनी व्यक्त केले. 

ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पांडुरंग पिसे, अन्वर पटेल, डॉ.एफ.एम.पटेल, शिवराम आलासे, संदेश पाटील, विष्णू पवार, भीमराव नायकवडी, चेतन जाधव आदी उपस्थित होते.

देशातील सर्वात तरूण महापौर करणार आमदारासोबत लग्नं

विशेष लेख : शिवाजी महाराज आज असते तर !

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ५३५ जागा!


Related Articles

- Advertisement -

Latest Articles