Thursday, March 13, 2025

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा दूर करा – DYFI

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

कोल्हापूर : १८ ते ४५ वयोगटातील सर्वांना अपुऱ्या लस साठ्यामुळे लस मिळत नसल्याने त्याची पूर्तता करून तातडीने लस उपलब्ध करुन देण्याची मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सध्या राज्यात विविध जिल्हा कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी धोका अजून टळलेला नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेतही तज्ज्ञांनी दिले आहेत. अशावेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरण लवकर होणज गरजेचे असल्याचेही डीवायएफआय ने म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी डीवायएफआय चे कोल्हापूर जिल्हा निमंत्रक प्रफुल्ल पाटील, प्रविण जाधव, संदेश जाधव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles