Wednesday, April 24, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकोल्हापूर : शैक्षणिक साहित्य वाटप ही चळवळ व्हावी - विश्वास सुतार यांचे...

कोल्हापूर : शैक्षणिक साहित्य वाटप ही चळवळ व्हावी – विश्वास सुतार यांचे प्रतिपादन

कोल्हापूर, दि. १८ : कोरोनाच्या महामारीत शैक्षणिक संस्था बंद आहेत. मुलं शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ नयेत यासाठी कोल्हापूरतील निर्मिती विचारमंच व संवाद कोचिंग क्लासेस यांनी सुरु केलेला शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम अभिनव असा आहे. हा उपक्रम केवळ एक मोहिम न बनता त्याची व्यापक चळवळ व्हावी असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी, प्रसिद्ध लेखक विश्वास सुतार यांनी केले. 

आपल्या आवती भोवतीचे कोणतेही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांना किमान शैक्षणिक साहित्य देण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकी मानून प्रत्येकाने घेतली तर कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेले सर्वच विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहामध्ये सामील होतील असे प्रतिपादन निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने यांनी केले.

आजच्या अडचणीच्या काळात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समाजातील शिक्षकांसह सर्वच संवेदनशील व्यक्तीने उचललेली पाहिजे असे प्रतिपादन शिक्षक चळवळीचे नेते अमित मेधावी यांनी केले.अडचणीत आलेल्या व्यक्तींना मदत करणे यातच खरी माणुसकी असल्याचे मत प्रसिद्ध कवी वसंत भागवत यांनी केले.

निर्मिती विचारमंच येथील आदित्य सभागृहात पार पडलेल्या या शैक्षणिक साहित्य वाटपावेळी पन्नास विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट देण्यात आले. संवाद कोचिंग क्लासच्या संचलिका प्रा. शोभा चाळके यांनी संवाद कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून गेले महिनाभर बेसिक इंग्रजीचे क्लासेस सुरु केले होते. त्या क्लासेसच्या जमा झालेल्या फी मधुन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास संदिप कांबळे, मंदार पाटील, चंद्रकांत सावंत, विजय कोरे, स्नेहल पोतदार यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शोभा चाळके यांनी केले तर आभार संदीप कांबळे यांनी मानले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय