Friday, April 19, 2024
Homeजिल्हाकोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

कोल्हापूर (दिनेश चोरगे) : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळेच कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी येत असून यापुढेही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे यांनी माजी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिली.

कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेमध्ये शहरातील एकूण २ लाख ८७ हजार ४७ संशयित नागरिकांची तपासणी केली. यामध्ये ८७ टक्के आरटीपीसीआर आणि १३ टक्के अँटीजन तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये एकूण ३१ हजार ३५७ नागरिक पॉझिटिव्ह आले. याचे प्रमाण हे १०.९२ टक्के आहे. यातील २८ हजार ५०३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ९०.५ टक्के आहे. सध्या शहरात २ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोव्हीडचा मृत्यूदर हा २.५९ टक्के असून आतापर्यंत ८१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात १६६ ऍक्टिव्ह कंटेन्मेंट झोन आहेत. तापसण्यावर भर दिल्यानेच रुग्णासंख्या वाढली असल्याने संभाव्य धोका टाळण्यास मदत झाली आहे. महापालिकेने वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना पॉझिटिव्ह रेट हा कमी येत आहे. लवकरच कोरोनामुक्त कोल्हापूर होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना यापुढेही युद्धपातळीवर राबवल्या जातील असे आयुक्तांनी सांगितले.  व यानंतर माजी पदाधिकाऱ्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. 

माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी प्रत्येक कोवीड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी हेल्पलाईन नंबर प्रसिध्द करावा. प्रत्येक खाजगी हॉस्पीटलला नियंत्रण अधिकारी यांनी वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. माजी गटनेते शारगंधर देशमुख यांनी कोल्हापूर शहरातील खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी डिपॉझिट रक्कम घेतल्याशिवाय दाखल करून घेतले जात नाही. शहरातील नामांकित हॉस्पीटलबाबत नागरीकांच्या तक्रारी येत आहेत. यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. 

राहुल चव्हाण यांनी लसीकरणासाठी नागरिकांना केंद्रावरून इतर केंद्रावर पाठवले जाते हा प्रकार थांबला पाहिजे. मृत्यू दाखले मिळण्याला नागरिकांची हेळसांड होत आहे. यावर आयुक्त डॉ बलकवडे यांनी याबाबत योग्य उपाययोजना केल्या जातील असं सांगितलं.

यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी गटनेता सुनील पाटील, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आशपाक आजरेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय