Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Kolhapur : ‘डॉक्टरांनी केले मृत घोषित, रूग्ण आला घरी चालत’ या अजब घटनेची जोरदार चर्चा

कोल्हापूर : कोल्हापुरात एक अजब घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केलेला व्यक्ती अचानक जिवंत झाल्याने ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. एका वृद्ध व्यक्तीला अंत्ययात्रेसाठी रुग्णवाहिकेतून घरी आणले जात होते. मात्र, रस्त्यात रुग्णवाहिकेला खड्ड्याचा धक्का बसला यातून ते त्यांच्या शरिराची हालचाल झाली आणि ते अचानक जिवंत झाले. (Kolhapur news)

---Advertisement---

सविस्तर माहिती अशी कि, वारकरी संप्रदायातील पांडुरंग उलपे (वय ७२) यांना सोळा डिसेंबर रोजी हरिनामाचा जप करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी रात्री उशिरा त्यांना मृत घोषित केले. ही बातमी परिसरात पसरल्यानंतर नातेवाईक व गावकरी अंत्यविधीच्या तयारीसाठी जमले होते.

पांडुरंग उलपे यांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांना रुग्णवाहिकेतून घरी आणले जात होते. मात्र, रस्त्यात रुग्णवाहिकेला खड्ड्याचा धक्का बसला आणि पांडुरंग उलपे यांच्या शरीराची हालचाल झाली. ही घटना पाहून नातेवाईकांनी त्यांना तातडीने कदमवाडी येथील रुग्णालयात नेले.

---Advertisement---

रुग्णालयात पुन्हा उपचार सुरू करण्यात आले. पांडुरंग उलपे यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत होते आणि काही वेळातच ते शुद्धीवर आले. सोमवारी पांडुरंग उलपे स्वतःच्या पायावर उभे राहून घरी परतले. या चमत्काराला नातेवाईक पांडुरंगाची कृपा मानत आहेत.

एका खड्ड्यामुळे एका वृद्ध व्यक्तीला जीवदान मिळाल्याने कोल्हापूरच्या (Kolhapur news) कसबा बावडा येथे घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

Kolhapur Ambulance hits pit and dead patient comes alive

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

पुणे मेट्रो फेज 2 मध्ये सात नवीन मार्गांचा समावेश

अभिनेता दिलीप शंकर यांचे निधन, हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह

मोठी बातमी : पुजाऱ्यांना मिळणार दरमहा 18,000 सन्मान निधी

मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles