Friday, March 29, 2024
Homeग्रामीणनारायणगाव : चोरीला गेलेले सुमारे अडीच लाखांचे दागिने खाकितील विठ्ठलाने दिले मिळवून

नारायणगाव : चोरीला गेलेले सुमारे अडीच लाखांचे दागिने खाकितील विठ्ठलाने दिले मिळवून

चोरी गेलेले सुमारे अडीच लाखांचे दागिने दिले मिळवून ! 

नारायणगाव / रवींद्र कोल्हे : नारायणगाव येथील कोल्हेमळा शिवारातील रहिवाशी वनिता विटे यांच्या घरातून दोघा चोरट्यांनी चोरी करून, मंगळसूत्र, कानातील टॉप्स व रोख चोरून नेले होते. मात्र नारायणगाव पोलिसांनी तपासकामी ताब्यात घेतलेल्या दोन संशयित आरोपींकडून चोरी गेलेले दागिने हस्तगत करून व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित महिलेला दागिने परत केले. खाकितील विठ्ठलाने महिलेचा सन्मान मिळवून दिल्याची भावना कोल्हेमळा शिवारात चालू होती.

नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी वनिता सुधाकर विटे ( वय ४१ रा. कोल्हेमळा, नारायणगाव, ता. जुन्नर जि. पुणे) यांना चोरट्यांकडून हस्तगत केलेले दागिने पुन्हा मिळवून दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील कोल्हेमळा शिवारातील रहिवाशी वनिता सुधाकर विटे यांचे नारायणगाव जुन्या बाजारपेठेत शिलाई (टेलरिंग) व्यवसाय आहे. सात महिन्यांपूर्वी नेहमीप्रमाणे त्या दुकानांत आपल्या कामासाठी आल्या असता, घरी फक्त मुलं होती, त्यावेळी घरात एका इसमाने प्रवेश करून, हातचलाखीने कपाटातील दागिने आणि रोख रक्कम लांबविली. त्यानंतर नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. 

त्यावेळी गुन्हा र.नं.०३/२०२१ भारतीय दंड कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल झाला होता. चोरीचा गुन्हा घडून सहा महिने उलटले तरी तपासकामी पोलिसांना यश येईना. मात्र नुकताच भारती विद्यापीठ पोलिस ठाणे (आयुक्तालय) पुण्यात गुन्हा र.नं.५४३/२०२१ भारतीय दंड विधान कलम ४५४, ४५७, ३८० या गुन्ह्यात शहर पोलिसांच्या ताब्यातील अटक आरोपी युवराज अर्जुन डोणे वय २६ वर्षे, अविनाश अर्जुन डोणे वय २१ वर्षे दोघेही रा.निरजगाव, कवडेवस्ती, ता.कर्जत, जि.अहमदनगर या आरोपींनी नारायणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोल्हेमळा शिवारातील चोरीच्या गुन्ह्यात असलेबाबत संशय आल्याने त्यांना तपासकामी नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा : जुन्नर तालुक्यात आज (ता.२५) आढळले ७८ करोनाचे रुग्ण

नारायणगाव पोलीसांनी गुन्हा र.नं.०३/२०२१ या गुन्ह्यातील न्यायालयाच्या आदेशानेताब्यात कसून चौकशी केली असता, दोन्ही आरोपींनी फिर्यादी महिला यांचे घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केले असले बाबत कबुली दिली असून, रोख रक्कम खाण्या-पिण्यावारी खर्च झाले असल्याचे सांगितले व सोन्याचे मंगळसूत्र निलेश कुंदनलाल झाडमुथ्था वय ३८ वर्षे रा.डोंगराण, ता.आष्टी, जि.बीड यास विकले असल्याचे सांगितले. त्यावरून नारायणगाव पोलिसांनी विकत घेणारा (झाडमुथ्था) याचेकडून हस्तगत केले.

तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी निलेश कुंदनलाल झाडमुथ्था यास सोन्याचे दागिने चोरीचे आहेत हे माहीत असतानाही त्याने दोन्ही आरोपींकडून खरेदी केले असल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी सदरचा गुन्हा सांगनमताने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदर गुन्ह्यात भारतीय दंड विधान कलम (IPC) ४११, ३४ हे वाढीव कलम लावण्यात आले. 

सदर आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मंगळसूत्र सुमारे किंमत २ लाख १६ हजार रुपये व एक सोन्याचे टॉप्स जोड किंमत २२ हजार ५०० रुपये असा मुद्देमाल जुन्नर न्यायालयाच्या आदेशान्वये फिर्यादी महिला वनिता सुधाकर विटे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय