Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

व्हिडिओ : PCMC गुडघाभर पाणी, रस्ते झाले तलाव, स्टॉर्म वॉटर व्यवस्थापन कोसळले

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – शहरात पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने चिखली स्पाईन रोडवर सायंकाळी (दि.२९ मे) पाणी साचून तळे निर्माण झाले.पुरा सारखा वेग असलेल्या या पाण्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली. चिखली घरकुल परिसरातील भाजी मंडई परिसरात तुडुंब पाणी भरल्यामुळे नागरिकांना गुडघाभर पाण्यातून चालावे लागत होते. चिखली, जाधववाडी, घरकुल, कुदळवाडी, स्पाईन रोड परिसरातील गेली दहा वर्षे रस्ते जलमय होत आहेत.

---Advertisement---



याबाबत नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत

सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर म्हणाले की, घटकूल परिसरात तासभर पाऊस पडला की, सर्व रस्ते जलमय होऊन तळमजल्यावर पण पाणी तुंबते. गेली दहा वर्षे पावसाळी पाण्याचे निचरा व्यवस्थापन कोसळत आहे. संपूर्ण पावसाळ्यात आम्ही पुरासारखी स्थिती सहन करत असतो. प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत.



घरकुल येथील नागरिक बाबासाहेब चौधरी म्हणाले की,भाजी मंडई व रस्त्यावर पाणी तुंबले की, चिखल राडारोडा यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.जेष्ठ नागरिक यशवंत कण्हेरे म्हणाले की,स्पाईन रोड कुदळवाडी उड्डाणपुलाखाली आम्ही अडकून होतो.पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की,आम्ही दुचाकीसह वाहून गेलो असतो, मनपाच्या स्टॉर्म वॉटर पाईपलाईन तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles