Wednesday, January 15, 2025
HomeNewsतिरपाड येथील वनविभागाचे निवासस्थान बांधकामाबाबत, किसान सभेचे वनविभागास जाहीर आवाहन

तिरपाड येथील वनविभागाचे निवासस्थान बांधकामाबाबत, किसान सभेचे वनविभागास जाहीर आवाहन

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील तिरपाड येथील वनविभागाचे निवासस्थान बांधकामाबाबत, किसान सभेने वनविभागास जाहीर आवाहन केले आहे. तसेच तिरपाड ग्रामसभेसोबत वनविभागाने संवाद साधत ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर करावा, अशी भूमिका किसान सभेच्या वतीने मांडण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, आंबेगाव तालुक्यातील तिरपाड, याठिकाणी सुरू असणाऱ्या वनविभाग निवासस्थान बांधकामाबाबत तिरपाड ग्रामसभेने आपले म्हणणे या अगोदरच वन विभागास सादर केलेले आहे. त्यानुसार वन विभागाने सदरील बांधकाम काही दिवस बंद केले होते व आता हे बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यावरून ग्रामस्थ व वनविभाग यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

एखादा सिनेमा आवडला आणि त्याबद्दल लिहिण्याची हल्ली चोरीच झालीये, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत..

तिरपाड ग्रामसभेला सामूहिक वनहक्क अधिकार प्राप्त झालेले आहेत व हे गाव पेसा क्षेत्र आहे. सामूहिक वन हक्क तिरपाड ग्रामसभेस प्राप्त झाल्याने सदरील ग्रामसभेस जंगलाचे व्यवस्थापन, संरक्षण, पुनर्निर्माण व नियोजन करण्याचे कायदेशीर अधिकार प्राप्त झालेले आहेत हा मुद्दा वन विभागाने दुर्लक्षून चालणार नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर किसान सभा वन विभागास आवाहन केले आहे की, “सदरील बांधकामाबाबत तिरपाड ग्रामसभेशी बोलून, ग्रामसभेचे म्हणणे लक्षात घेऊन व ग्रामसभेशी संवादी भूमिका घेत, परस्पर सामंजस्याने, ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर करावा, अशी आग्रही मागणी किसान सभेचे कृष्णा वडेकर, राजू घोडे, अशोक पेकारी यांनी केली आहे.

सुन भांडखोर आहे, मग न्यायालयाचा ‘हा’ महत्वपूर्ण निकाल जरूर वाचा !

नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण


संबंधित लेख

लोकप्रिय