जालना : अखिल भारतीय किसान सभा घनसावंगी तालुका कमिटीची बैठक आज दि. 9 मार्च 2022 रोजी पार पडली त्याचबरोबर किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी या बैठकीस फोनद्वारे मार्गदर्शन केले. घनसावंगी तहसील कार्यालय येथे दि. 16 मार्च रोथी निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न, शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडणे, थकीत पीकविमा या व इतर स्थानिक मागण्यांवर सखोल चर्चा करून विविध प्रश्नांवर किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. गोविंद आर्दड यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले ही बैठक लाल बावटा कार्यालय घनसावंगी येथे किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ.अंशीराम गणगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली व बैठकीत सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी बाळासाहेब राऊत, अप्पासाहेब काकडे, राजाराम काकडे, ज्ञानेश्वर लहाने, संतोष नांदगुरे, बजरंग तौर, अजित पंडित आदींची उपस्तिथी होती.