खेड : ‘स्वर्गीय दयानंद येळवंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त निघोजे ता.खेड जि. पुणे येथे रक्तदान शिबिर, व समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला.
पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमात बोलताना प्रबोधनकार इंदुरीकर महाराज म्हणाले, “आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा त्यांनी घालून दिलेल्या आदर्श मार्गदर्शन प्रमाणे वागल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल”
प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वर्गीय दयानंद येळवंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या १६० पेक्षा अधिक रक्तदात्यानी रक्तदान करून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जि. सदस्य शांताराम सोनवणे, शिलाताई शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, नगरसेवक पंकज भालेकर, उपसरपंच सचिन येळवंडे, किरण मांजरे, नाना टाकळकर, सतीश राक्षे, अशोक खंडेभराड, प्रकाश वाडेकर, बाळासाहेब राळे, आण्णासाहेब भेगडे, विनोद म्हाळुंकर, हिरामण येळवंडे, कुलदीप येळवंडे, संतोष येळवंडे, संतोष शिंदे पंचक्रोशीतील विविध गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष, संचालक मान्यवर उपस्थित होते.