खिरेश्वर (जुन्नर) : कोरोनाचे संकट गडद होत असताना धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. यात्रा, जत्रा आणि जयंती, उत्सव सुध्दा रद्द केले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील हरिश्चंद्रगड (खिरेश्वर) येथे शिवरात्रीला भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
गुरुवार (ता.११) मार्च रोजी श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर तसेच हरिश्चंद्रगड येथे होणारी महाशिवरात्री यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असल्याचे ग्रामपंचायती कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दुकानदारांनी कोणत्याही प्रकारची दुकाने लावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यातील कोरोनाचे संकट गडद होत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींंकडून खबरदारी घेतली जात आहे. तसेच नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवहान केले जात आहे.