Thursday, April 25, 2024
Homeग्रामीणखेड : आदिवासी युवा मंच तर्फे नायफड गावामध्ये कोरोना प्रतिबंध लसीकरण कॅम्प...

खेड : आदिवासी युवा मंच तर्फे नायफड गावामध्ये कोरोना प्रतिबंध लसीकरण कॅम्प संपन्न

खेड : दिनांक 25 जून रोजी खेड तालुक्यातील नायफड गावामध्ये कोविड 19 चे लसीकरण करण्यात आले. कोरोनाचे लस प्राथमिक आरोग्य केंद्र डेहणे येथे उपलब्ध होत होती परंतु नायफड ग्रामस्थांना नायफड पासून डेहणे हे पाच किलोमीटर अंतर पार करून लस घेण्यासाठी जावे लागत होते. आणि लस घेऊन पुन्हा माघारी येतावेळेस रस्त्यावर चक्कर येऊन पडणे, पावसात भिजून आजारी पडणे असे प्रकार घडू नये यासाठी नायफड येथील आदिवासी युवा मंचच्या वतीने लसीकरण कॅम्प घेण्यात आला.

या लसीकरण कॅम्प गावातील ८० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती विकास भाईक यांनी दिले. या लसीकरण मोहिमेसाठी डेहणे येथील डॉ. पंडित आणि टीमचे योगदान लाभले.

या कार्यासाठी आदिवासी युवा मंचाचे निलेश तिटकारे, विकास भाईक, सुदर्शन तिटकारे, शरद ठोकळ, भगवान काठे, गणेश तिटकारे, श्याम मिलखे, रोहित ठोकळ, राहुल तिटकारे, दत्ता तिटकारे सह अनेक कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सुनिल मिलखे व रोहिदास भाईक यांनी उपस्थिती राहून हे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय