Friday, March 29, 2024
Homeजिल्हाखेड सेझ प्रकल्पबाधित शेतकरी करणार आंदोलन, बैठकीत निर्णय

खेड सेझ प्रकल्पबाधित शेतकरी करणार आंदोलन, बैठकीत निर्णय

शेतकरी प्रतिनिधींंची पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

खेड :  रविवार दिनांक 20 जून रोजी शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे येथील कृष्णपिंगाक्ष कार्यालयाच्या प्रांगणात निवडक शेतकरी प्रतिनिधीची महत्वपूर्ण बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश सचिव हरेश देखणे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. 

बैठकीमध्ये 15 टक्के परताव्याच्या महत्त्वपूर्ण विषयांवर व भविष्यातील धोरणांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत पंधरा टक्के परतावा प्रश्नाची सद्यस्थिती व यापुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर संघटनांच्या मदतीने जनआंदोलन कसे उभे करावयाचे या बाबतीत चर्चा झाली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव हरेश देखणे, यांनी मार्गदर्शन करताना पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शेतकऱ्यांच्या पाठी मागे ठाम उभी राहणार असून त्यांना या प्रश्नात न्याय मिळवून देणार आहे असे सांगितले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, व संबंधित प्रशासकीय यंत्रणा यांना संघटनेच्या लेटरहेडवर ड्राफ्ट/निवेदने या प्रश्नासंदर्भात सुरुवातीला पाठवण्यात येतील. त्यानंतर जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. व सेझ बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली नाही. तर टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्यात येतील. असे हरीश देखणे यांनी जाहीर केले व सेझ बाधित शेतकरी प्रतिनिधींनीत्याला सहकार्य करण्याचे मान्य केले.

■ असे असणार आंदोलनाचे टप्पे : 

● प्रांत अधिकारी कार्यालय, खेड या ठिकाणी आंदोलन. त्यानंतरही दाद मिळाली नाही तर

● एम.आय.डी.सी. प्रादेशिक कार्यालय पुणे, या ठिकाणी तीव्र आंदोलन, त्यानंतरही दाद मिळाली नाही तर 

● मुख्यमंत्री निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन करण्याचे नियोजन

 बैठकीसाठी काशिनाथ  हजारे, गुलाब हजारे, भानुदास नेटके, सुदामराव तांबे, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, मनोहर गोर गल्ले, शिवाजी भांबरे, हसमुद्दिन शेख, रावसाहेब शिंदे, ओंकार भालेकर, व इतर प्रमुख शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय