Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडKhed : निघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध

Khed : निघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील निघोजे ( ता. खेड ) निघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा गणेश फडके यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी व्हि. एल. गाडीलकर यांनी सांगितले. khed news

निघोजे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दत्तात्रय आंद्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा इतर सदस्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी राजीनामा दिला होता. या मुळे उपसरपंच पदाची एक जागा रिक्त होती. उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदाच्या निवडी साठी सरपंच सुनीता येळवंडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी मुदतीत अर्ज भरण्याचे वेळेत इंदिरा गणेश फडके यांचा एकमेव अर्ज आला होता. तो अर्ज वैध ठरला. एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने उपसरपंच पदी इंदिरा गणेश फडके यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच तथा पीठासीन अधिकारी सुनीता येळवंडे यांनी केली. khed news

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय आंद्रे, अजित येळवंडे, समाधान येळवंडे, सागर येळवंडे, दिपक कांबळे, प्रियांका आल्हाट, छाया येळवंडे, रुपाली येळवंडे, मनीषा बेंडाले, अलका येळवंडे, स्नेहा फडके, ग्रामविकास अधिकारी व्हि. एल. गाडीलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, निघोजे ग्रामस्थ, सेवक कर्मचारी वृन्द यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित उपसरपंच इंदिरा फडके यांचा सत्कार करण्यात आला, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

संबंधित लेख

लोकप्रिय