Friday, March 29, 2024
Homeजिल्हाकेतकी चितळे आणि तिच्यासारखी विकृत मानसकिता घडविणा-यांचि निषेध - संजोग वाघेरे (पाटील)

केतकी चितळे आणि तिच्यासारखी विकृत मानसकिता घडविणा-यांचि निषेध – संजोग वाघेरे (पाटील)

 

पिंपरीत पोलिसांकडे तक्रार करून‌ राष्ट्रवादी काँग्रेसची कारवाईची मागणी

पिंपरी चिंचवड – देशातील आदरणीय ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांबद्दल सोशल माध्यमावर केतकी चितळे हिने विकृत मानसिकतेतून पोस्ट टाकली.तिचा आणि तीची ही विकृत मानसिकता घडविणा-यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध करत आहोत.या केतकी चितळेवर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात संजोग वाघेरे‌ पाटील यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबात तक्रार केली आहे. या संदर्भात वाघेरे पाटील म्हणाले की,कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचा कायम सन्मान राखणारे, तसेच अशा विविध क्षेत्रीतील मंडळींच्या मदतीला धावून जाणारे देशातील एकमेव नेते म्हणून शरद पवार साहेबांची ओळख आहे.परंतु, मागील काळात देशात आणि राज्यात विकृत मानसिकता घडविण्याचे काम सुरू आहे.धर्म,जातीय तेढ निर्माण करताना आपल्या विरोधी भूमिका मांडणा-या नेत्यांच्या बदनामीचे षडयंत्र आखले जात आहे. केतकी चितळे हा त्याचाच एक भाग आहे.तिने शरद पवार साहेबांबद्दल केलेली पोस्ट तिची विकृत मनोवृत्ती दर्शविणारी आहे. या निदंनीय प्रकाराबद्दल तिचा तीव्र निषेध करताना ही विकृत मानसिकता घडविणा-यांचा निषेध करावा लागेल.

 शरद पवार साहेब यांच्या कार्य आणि वाटचाल समजून घेण्यासाठी तेवढी बौध्दिक क्षमता आवश्यक आहे.ती क्षमता नसलेल्या लोकांच्या सहवासामुळे केतकी चितळेसारखे लोक काहीही बरळत असतील.परंतु, ते महाराष्ट् आणि शरद पवार साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता सहन करणार नाही.त्यामुळे केतकी चितळे हिच्या वक्तव्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी.तसेच,समाजात अशा प्रकारे व्यक्तीव्देषापोटी खालच्या स्तरावर जाऊन टिका टिपण्णी करत असेल आणि त्याला प्रोत्साहन देत असेल,तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हावी,असे ते म्हणाले.

क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय