Wednesday, April 24, 2024
Homeराष्ट्रीयकेरळ सरकारकडे आता स्वत: ची इंटरनेट सेवा, २० लाख गरीब परिवारांना देणार...

केरळ सरकारकडे आता स्वत: ची इंटरनेट सेवा, २० लाख गरीब परिवारांना देणार फ्री इंटरनेट

तिरुवनंतपुरम : देशात सर्वाधिक साक्षरता म्हणून केरळ राज्याची ओळख आहे. केरळ शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर असून आता केरळने स्वत: ची इंटरनेट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे स्वत:चे इंटरनेट असलेले देशातील पहिले आणि एकमेव राज्य हे केरळ ठरले आहे. याबाबत मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ट्वीट करून माहिती दिली.

केरळ मध्ये सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली डावी आघाडीचे सरकार सत्तेत आहे. डाव्या आघाडीला पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळाल्यानंतर सरकार लोककेंद्री विकासावर भर देताना दिसत आहेत. अशातच केरळने इंटरनेट सेवेतही भरारी घेतली आहे.

गरीब घरातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत इंटरनेट सेवा पोहोचविण्याची केरळ सरकारची योजना आहे. यासाठी १५४८ कोटी खर्चाच्या या फायबर ऑप्टीक नेटवर्कला मंजुरी दिली होती. याचा २० लाख गरीब परिवारांना फ्री हायस्पीड इंटरनेट कनेक्शन दिले जाणार आहे. या सोबतच ३० हजार हून अधिक सरकारी ऑफिसेस आणि शाळा नेटने जोडल्या जाणार आहेत. केरळ फायबर ऑप्टीक नेटवर्क लिमिटेड, दूरसंचार विभाग इंटरनेट सेवा पुरवठा परवाना मिळाल्याचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ट्वीट करून जाहीर केले.

पी. विजयन म्हणाले की, केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेड ही सरकारची महत्त्वाकांक्षी आयटी पायाभूत सुविधा योजना आहे. ज्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक कानाकोपर्या तील प्रत्येक व्यक्तीला मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक गावात आणि शहरापर्यंत इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार आहे. इंटरनेट योजनेमुळे वाहतूक, व्यवस्थापन आणि आयटी क्षेत्रांनाही चालना मिळेल. केरळ सरकारच्या म्हणण्यानुसार, इंटरनेटचा वापर हा राज्यघटनेच्या शिक्षणाचा हक्क आणि गोपनीयतेच्या अधिकाराचा भाग आहे.

हेही वाचा

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई येथे भरती

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ST महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय