Monday, July 15, 2024
Homeराष्ट्रीययुक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या परिस्थितीबाबत केरळचे मुख्यमंत्री विजयन यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या परिस्थितीबाबत केरळचे मुख्यमंत्री विजयन यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

केरळ : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या, विशेषत: विद्यार्थ्यांच्या परिस्थितीबाबत २७ फेब्रुवारी २०२२ च्या पत्राचा पाठपुरावा करण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी मोदींना पत्र पाठवले आहे. ते संपुर्ण पत्र…

‘ऑपरेशन गंगा’ या केंद्र सरकारच्या उपक्रमाबद्दल आम्ही आभारी आहोत, ज्यामुळे केरळमधील 244 विद्यार्थी स्वगृही परतले आणि बरेच विद्यार्थी त्यांच्या मार्गावर आहेत. आम्ही युक्रेनमध्ये अजूनही अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या संपर्कात आहोत, त्यांना आश्वस्त करून विद्यार्थ्यांच्या परतीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

हजारो विद्यार्थी खारकीव, सुमी आणि पूर्व युक्रेनच्या इतर भागांमध्ये अजूनही अडकले आहेत याकडे माननीय पंतप्रधानांचे तातडीने द्यावे. 

निष्काशनाचे प्रयत्न आतापर्यंत कीव आणि तुलनेने सुरक्षित अशा पश्चिम युक्रेनवर केंद्रित आहेत. सध्या, पूर्वेकडे युद्ध तीव्र झाले आहे. खारकीव आणि सुमी शहरांमध्ये जोरदार बॉम्बस्फोट आणि प्रचंड गोळीबार होत आहे. या युद्ध परिस्थितीत विद्यार्थ्यांनी काय करावे, याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिले गेलेले नाहीत. घाबरून आणि हताशपणे अनेक विद्यार्थी जीवाचा धोका पत्करून पश्चिमेकडे निघून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या बंकरमध्ये असलेले विद्यार्थी उपासमारीला सामोरे जात आहेत. त्यांचा पाणी आणि अन्नाचा पुरवठा संपला आहे. आधीच्या पत्रात, पूर्व युक्रेनमधील विद्यार्थ्यांना रशियाच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आणि बंकरमध्ये आश्रय घेतलेल्यांना अन्न आणि पाणी पुरविण्याची विनंती करण्यात आली होती.

त्यांना युद्धक्षेत्रातून ताबडतोब बाहेर येण्यासाठी मानवीय कॉरिडॉर तयार करण्याबाबत मी रशियाच्या नेतृत्वासह तुमच्या तातडीच्या वैयक्तिक हस्तक्षेपाची विनंती करतो. इंटरनॅशनल रेडक्रॉससह स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून संबंधित सरकारांद्वारे लोकांना अन्न आणि पाणी मिळवून देण्यासाठी तातडीची पावले देखील उचलली जाण्याची अपेक्षा आहे.

– पिनारायी विजयन

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय