कर्नाल : हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातून 4 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आलं आहे. या संशयित दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हे चार संशयित पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडमध्ये निघाले होते, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ४ वाजता बस्तारा टोल प्लाझा येथून 4 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आले. हे सर्वजण इनोव्हा कारमधून जात होते. प्राथमिक तपासात हे सर्वजण पंजाबहून दिल्लीला जात असल्याचे निष्पन्न झाले असून आयबीच्या अहवालावरून नाकाबंदी करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या 4 संशयित दहशतवाद्यांकडून गनपावडर, गोळ्या, शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
भोंग्याच्या वादावर अभिनेता सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, 31 जिवंत काडतुसे, 3 लोखंडी कंटेनर आणि 1 लाख 30 हजार रुपये जप्त केले आहेत. तीन दहशतवादी फिरोजपूरचे रहिवासी आहेत. त्याचवेळी, एक दहशतवादी लुधियानाचा रहिवासी आहे. जप्त करण्यात आलेली गनपावडर आरडीएक्स असू शकते. सध्या पोलिसांची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे दहशतवादी अनेक ठिकाणी मोठ्या घटना घडवून आणू शकले असते. अशी शक्यता पोलिस व्यक्त करत आहे. चार आरोपींविरुद्ध मधुबन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Haryana | Karnal Police detains four terror suspects, recovers a large cache of explosives
Details awaited. pic.twitter.com/4p06SH67tf
— ANI (@ANI) May 5, 2022
बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख
ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे भारतात आली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींच्या चौकशीत जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचे कनेक्शन पाकिस्तानातून समोर आले आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या फिरोजपूरमध्ये ड्रोनद्वारे या शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात आला होता. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखती द्वारे होणार निवड !
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती, 8 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख