Friday, March 29, 2024
Homeजिल्हापुणे : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती समारंभ संपन्न

पुणे : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती समारंभ संपन्न

पुणे / डॉ. कुंडलिक पारधी : रयत शिक्षण संस्था ही त्यागातून उभी राहिलेली संस्था आहे. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील हे कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. कर्मवीरांनी गोरगरीब व वंचित समुदायासाठी काम केले. कर्मवीरांनी महात्मा फुले यांचे सत्यशोधक समाजाचे कार्य  केले. कर्मवीरांनी सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी वसतिगृह काढले. त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी झाला. रयत ही एक वेगळी संस्कृती आहे. रयतेचे कार्यकर्ते ही कर्मवीरांच्या संस्कृतीमधून तयार झाले आहेत. रयत सेवक हे मनाने अतिशय निर्मळ आहेत. त्यांचा समाजावर उत्तम परिणाम होतो. महात्मा फुले यांचे माणूस घडविण्याचे कार्य कर्मवीरांनी केले. वंचितांसाठी काम करून, कर्मवीरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारूया, प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे, माजी सचिव, प्राचार्य डॉ. जनार्दन जाधव यांनी केले.

ते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134 व्या जयंती समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार चेतन तुपे यांनी कर्मवीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा ! महाविकास आघाडीसह कामगार संघटना ‘भारत बंद’ सहभागी होणार, पुण्यात पत्रकार परिषद

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार वारसा जोपासू या. कोरोनाच्या काळातही रयतेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केले. त्यागमय जीवनाची अखंड गाथा म्हणजे कर्मवीरांचे जीवन होय. कर्मवीरांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. असे विचार त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा ! पुणे : आदिवासी भागातील सचिन लांडे याची UPSC परिक्षेत गगनभरारी !

पद्मभूषण भाऊराव पाटील यांच्या  जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भित्तिपत्रिकेचे उद्घाटन साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी डॉ. रंजना जाधव व सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शिल्पा शितोळे यांनी त्याचे  संयोजन केले. तसेच सांस्कृतिक विभागाच्या वतीने काव्य लेखन, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे संयोजन  डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. अतुल चौरे, डॉ.विश्वास देशमुख यांनी केले. स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्रा. किरण गाढवे, प्रा. प्रिया शेळके, डॉ. संदीप वाकडे, डॉ. अतुल चौरे यांनी केले. 

हेही वाचा ! केळी खाण्याचे फायदे व तोटे !

राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचे संयोजन डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ. सुनील कुंटे, प्रा. ऋषिकेश खोडदे, यांनी आयोजन केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. संजय जडे, डॉ. संजय जगताप, डॉ. किशोर काकडे सर्व प्राध्यापक,  प्रशासकीय सेवक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय