(प्रतिनिधी):- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर टिव्ही आणि फिल्म इंडस्ट्रि सोबतच सर्वांना धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र तो डिप्रेशनमध्ये होता अशी माहिती मिळाली आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शक करण जोहरनं स्वत:ला दोषी ठरवले आहे.
A post shared by Karan Johar (@karanjohar) on
।सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर करण जोहरनं आपल्या सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. करण जोहर म्हणाला, “मी स्वत:ला दोषी मानतो कारण गेली वर्षभर मी तुझ्या संपर्कात राहिलो नाही. तुला आपलं आयुष्यातील दु:ख शेअर करण्यासाठी कुणाचीतरी गरज आहे, असं मला अनेकदा जाणवलं. मात्र माझ्या भावनांना मी व्यक्त झालो नाही. अशी चूक मी पुन्हा कधीच करणार नाही. आपल्याला फक्त नातं बनवून फायदा नाही तर ते निभावणंही तितकंच गरजेचं आहे. सुशांतच्या निधनामुळे मला मोठा धक्का बसला आहे. सर्व नाती सांभाळण्याची गरज आहे, याची जाणीव मला करून दिली. मला तुझं ते गोड हसू आणि मिठी कायम लक्षात राहिल.”