नवी दिल्ली – कोरोनाच्या महामारीच्या परिस्थितीत बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यामुळे येथील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अशातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार मैदानात उतरले आहेत.
कन्हैया कुमार बेगूसराय जिल्ह्यातील बखरी विधानसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार सूर्यकांत पासवान आणि तेघडा येथील उमेदवार रामरतन सिंह यांचे नामांकन भरताना उपस्थित होते. या वेळी कन्हैया कुमार यांनी आयोजित सभेत भाजपावर हल्लाबोल करत जोरदार टीकास्त्र सोडलं. कन्हैया कुमार यांनी म्हटलं की,’पूर्वी ईव्हीएम हॅक होत होते, आता तर भाजपाचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत आहेत.
ते पुढे म्हणाले कि, मला सतत देशद्रोही म्हणत असाल तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन. असं म्हणत त्यांनी भाजप पक्षावर जोरदार निशाणा साधला. या संदर्भातील कन्हैया कुमार यांचा सभेतील व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.