आळंदी/अर्जुन मेदनकर: कला – क्रीडा – सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ‘अंनुअल कॉन्सर्ट-२०२३’ अर्थात वार्षिक स्नेहसंमेलन आनंदपूर्ण वातावरणात कल्पतरू किड्स इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये उत्साहात पार पडले. आनंदपूर्ण वातावरणात स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

यात बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन देखील उत्साही वातावरणात झाले. स्कूल मध्ये अंनुअल स्पोर्ट्स वीक मध्ये घेतलेल्या विविध क्रीडा स्पर्धा विजेत्यां विद्यार्थाना बक्षिसे वाटप करून आनंद द्विगुणित करण्यात आला. कार्यक्रमास इंडियन आर्मीचे लेफ्टनं कर्नल रामकृष्ण वाघ प्रमुख अतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी PSI विजय जगदाळे, कल्पतरू किड्स इंग्लिश मेडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विनायक पवार, सचिव अतुल हुंडारे, ज्ञानेश्वर वाहिले, निवृत्ती जगताप, मच्छिन्द्र हुंडारे, राजाराम पवार, शांताराम पवार, प्राचार्य नीता हुंडारे, भागवत काटकर, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक स्वप्नील जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष आकर्षण सर्व संगीत कार्यक्रम अतिशय नियोजन आणि डोळे दिपवणारे होते. उपस्थित सर्वांनीच त्यांची वाहवा केली. विद्यार्थ्यांनी आपल्या सांस्कृतिक परंपरागत चालत आलेल्या नृत्य प्रकारातून प्रेक्षकांची मने जिंकून आपली संस्कृती व सामाजिक, नैतिक मूल्यांचे जतन करण्याचे संदेश दिले.
