जस्ट फॉर हार्ट्स् Your virtual wellness partner – डॉ.रविंद्र कुलकर्णी
पिंपरी चिंचवड : गेली 10 हून अधिक वर्ष,अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स आणि डाएटिशियन यांना सोबत घेऊन जस्ट फॉर हार्टस्, ही संस्था जीवनशैली मधील सुधार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार यावर काम करत आहे.
डायबिटीस, हायपर टेन्शन, थायरॉईड, वेट management, गरोदरपणातील डायबिटिस, सर्जरी नंतरचे आहार व्यवस्थापन, cardiac rehabilitation, COVID home care, योग आणि फिटनेस यासारख्या अनेक विषयांवर ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले जाते. डायबिटीस पेशंट साठी आहार, पोषक स्मूदी, सलाड, लहनांसाठी योगासन, कीटो डाएट, वेगान डाएट अशा विषयांवर विविध कार्यशाळा घेऊन लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता वाढवण्याचे कार्य केले जाते. तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर आणि डाएटिशियन यांना त्यांचे ज्ञान शेअर करण्यासाठी तसेच नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य जस्ट फॉर हार्टस् तर्फे केले आहे.
आरोग्यविषयक विविध विषयांवर चर्चा, प्रश्नोत्तरे आम्ही 80 हजाराहून अधिक सभासद असणाऱ्या आमच्या युट्यूब कम्युनिटी च्या माध्यमातून करत असतो. 50 हजाराहून अधिक सभासद असणाऱ्या आमच्या फेसबुक पेज वरून, फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक चर्चासत्र दर आठवड्याला घेतली जातात. दर महिन्यातून एकदा पिंपरी चिंचवड येथील हेल्दी लाईफ क्लिनिक मध्ये विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. तसेच इतर वेळी घरपोच सर्व्हिस देऊन आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
आरोग्यपूर्ण जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठी जस्ट फॉर हार्टस् चे सीईओ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. रवींद्र कुलकर्णी, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा देवकर, डायबिटीस तज्ज्ञ डॉ. तेजस लिमये, स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट दिव्या सांगलीकर, सिनियर डाएटिशियन नेहा काटेकर आणि तेजश्री वडगावकर हे सर्व सदस्य नवनवीन उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांनी आरोग्यपूर्ण जीवनशैली कडे वाटचाल करावी म्हणून सतत प्रयत्नशील असतात. तुम्हालाही आमच्या उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास आमच्या सोशल मीडिया अकाउंट्स ना नक्की भेट द्या, त्याच्या लिंक इथे देत आहे.
https://www.facebook.com/justforhearts
https://www.instagram.com/justforhearts
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुम्ही 9422989425 या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता.