Wednesday, February 5, 2025

मांडवी खोऱ्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न !

कोपरे / संजय माळी : जुन्नर तालुक्यातील मांडवी नदीच्या खोऱ्यात आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठान व बिरसा बिग्रेड, ग्रामस्थ, पुताचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम गाव पातळीवर आयोजन करण्यात आले होते. 

संयुक्त राष्ट्र संघाने 1994 पासून 9 ऑगस्ट हा “जागतिक आदिवासी दिन” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. उलगुलान “आवाज बुलुंद करण्याचा हा दिवस विशिष्ठ प्रदेशातील लोकांच्या समान निसर्ग आधारित परंपरा जपणारा मूळ मानवी समाज, आदिम संस्कृती म्हणजेच आदिवासी समाज होय. कलम 244 (1) अंतर्गत 73 व्या घटना दुरुस्ती करण्यात आली पाचवी अनुसूची आधारे महामाहीम राष्ट्रपती यांनी संस्कृतिक व सामाजिक जतन करणारा पंचायत विस्तार कायदा (पेसा) 24 डिसेंबर 1996 जारी करून अधिकार बहाल केला आहे.

कोपरे, मांडवे, पुताचीवाडी, जांभूळशी, काठेवाडी, मुथालणें, या आदिवासी गावांमध्ये  कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

पूताचीवाडी येथे सकाळी सरपंच योगिता सखाराम दाभाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून कोरोना आपल्या गावच्या वेशीवर येवू दिला नाही. अशा सर्वच कर्मचाऱ्यांसाठी एक आगळावेगळा उपक्रम म्हणून आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रमुख उपस्थिती पांडुरंग जोशी, संजय भांगरे, राहुल सोनावणे, सखाराम दाभाडे समाज बांधव उपस्थित होते.

कोपरे येथे तरुण, महिला, सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांनी सकाळी एकत्र येऊन गावात प्रभात फेरी काढली, जय आदिवासी घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी सखाराम माळी, दगडू माळी, विठ्ठल कवठे, होसाबाई काठे यांनी उपस्थित जन समुदाय, आदिवासी बांधव यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षपदी नामदेव डामसे होते.

पंचक्रशोतील सर्वच तरुणांच्या वतीने वाघोबाचे मुथालाने घाट येथून अभिवादन करत मांडवे मार्गे जांभूळशी अशी बाईक रॅली काढण्यात आली होती. जांभूळशी येथे विराट सभा घेण्यात आली. सभेला अध्यक्ष पदी भास्कर कूडल, प्रमुख पाहुणे अश्विनी साबळे, सरपंच ठमाजी कवठे, उपसरपंच पारुबाई ठोगिरे होते.

त्यामध्ये डॉ. लक्ष्मण हगवणे, सुनील हगवणे, सोपान हगवणे, राहुल कवठे, दिपक हगवणे, अंकुश माळी, उमेश माळी, पांडुरंग मुठे, गणेश कवठे, संपत कवठे, सोमनाथ बांगर, सुनील कवठे, सोनू मुठे, किसन मुठे, उज्वला हगवणे, दिपाली हगवणे, सविता हगवणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात तरुण, महिला, सामाजिक कार्यकर्ते यांनी उत्सफूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय कुडल यांनी केले तर आभार प्रदर्शन रामदास दाभाडे मानले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles