Friday, April 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर : धामणखेल येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

जुन्नर : धामणखेल येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

जुन्नर : धामणखेल ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धरती आबा बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमात सामजिक कार्यकर्ते व संशोधक किरण लोहकरे यांनी जागतिक आदिवासी दिन व आदिवासींची सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी बोलताना त्यांनी जागतिक आदिवासी दिनाची पार्श्वभूमी तसेच जागतिक, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवर आदिवासींची सद्यस्थिती व आव्हाने याची आकडेवारीसह माहिती दिली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचाचे प्राध्यापक संजय साबळे यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व व आदिवासी क्रांतिकारकांच्या इतिहासाला उजाळा दिला. वनरक्षक मेजर रमेश खरमाळे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, महिला व नोकरदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमाला सरपंच संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई रघतवान, वन विभागाचे विधाटे, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक वर्पे, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संतोष जाधव यांनी, सूत्रसंचालन अभिषेक वर्पे यांनी तर आभारप्रदर्शन युवराज रघतवान यांनी मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय