Thursday, August 11, 2022
Homeकृषीजुन्नर : हिरडयाचे कारायचे काय ? हिरडा खरेदी सुरु करण्याची मागणी

जुन्नर : हिरडयाचे कारायचे काय ? हिरडा खरेदी सुरु करण्याची मागणी

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जनतेचे उत्पादनाच्या साधनापैकी हिरडा हे एक साधन आहे. भातशेती आणि हिरडा उत्पादन ही प्रामुख्याने या भागातील जनतेची साधन असली तर गेल्या चार वर्षापासून आदिवासी विकास महामंडळाकडून हिरडा खरेदी बंद आहे.

सध्या आदिवासी भागात हिरडा तोडणी झालेली असता ना खरेदी मात्र बंद असल्यामुळे आदिवासी बांधवांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

आदिवासी विकास महामंडळ शेतकऱ्यांकडून हिरडा खरेदी करत असते. हा संपूर्ण माल आदिवासी विकास महामंडळानी खरेदी न केल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बाळ हिरडा खरेदी सुरू करावी, यासाठी अनेकवेळा आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्याकडे शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे. तसेच बिरसा क्रांती दल, राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंच सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र , महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. 

तसेच आदिवासी विकास महामंडळाकडून वरई, सावा, भात, नाचणी आदी सर्व प्रकारची धान्य खरेदी केली जाते, परंतु तेही पुर्णतः बंद आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणात तोटा होत असून अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा बाळ हिरडा खरेदी करण्यासाठी तातडीने आदेश आदिवासी विकास महामंडळाला देण्यात यावेत, एवढीच अपेक्षा आदिवासी शेतकरी व्यक्त करीत आहे.

व्यापाऱ्यांकडून अल्पदरात हिरडा खरेदी 

आदिवासी विकास महामंडळ आणि व्यापारी बाळ हिरडा खरेदी करतात. परंतु महामंडळाकडून हिरडा खरेदी बंद असल्यामुळे तुटपुंज्या आणि अल्पदरात व्यापारी वर्ग हिरडा खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

हिरडा साठवणूकीमुळे वजनात घट

बाळ हिरड्याचे उत्पादन झाल्यानंतर त्याच वर्षी तो खरेदी केला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो. हिरडा साठवणूक केल्यास हिरड्याचे वजनामध्ये घट होत असते. त्यामुळे व्यापारी वर्ग हिरडा काढणीच्या वेळेसच बाळ हिरड्याचे भाव पाडतात. शेतकऱ्यांला हिरडा विकण्याशिवाय पर्याय नसतो, यामुळे शेतकऱ्यांला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते.

आदिवासी महामंडळाने योजना सुरू करावी सध्या मे महिन्यात बाळ हिरड्याची झाडावरून काढणी सुरू असून विक्रीही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे . परंतु शेतकऱ्यांचा माल आदिवासी विकास महामंडळ व खासगी व्यापारी खरेदी करत नाही . त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे . तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या विकासाच्या योजना बंद केल्या आहेत .


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय