Thursday, March 28, 2024
Homeग्रामीणजुन्नर : लसीकरण तिसरी लाट रोखू शकतो, देशात कोणी कोठेही लस घेऊ...

जुन्नर : लसीकरण तिसरी लाट रोखू शकतो, देशात कोणी कोठेही लस घेऊ शकता – आयुष प्रसाद

नारायणगाव / रवींद्र कोल्हे : कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सुरुवातीला मास्क, सेनेटायझर आणि सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा वापर केला गेला. त्यानंतर लसीकरण ‘त्रिसूत्री आणि लसीकरण’ यामुळे आपण कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखू शकतो, त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करावे, त्याचप्रमाणे देशातील व्यक्तीने रहात असलेल्या ठिकाणीच काय परंतू जिथे शक्य आहे तेथे लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मंगळवार (दि.३१ ऑगस्ट) रोजी ते आज सकाळी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.तालुक्यात लसीकरण कार्यक्रम सुरू असतांनाच नारायणगाव आणि वारुळवाडी येथे आयुष प्रसाद यांनी पत्रकरांशी संवाद साधला.

हे पहा ! जुन्नर : चावंड येथे नोकरदार ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

यावेळी सरपंच योगेश पाटे यांनी लसीकरणाची माहिती दिली. अनुक्रमे १ हजार ६०० आणि १ हजार ४००असे एकूण तीन हजार डोस लसींचे उद्दिष्ट पूर्ण करणार असून, आणखी लस लागल्यास प्रसाद साहेब देणार असल्याची माहिती सरपंच पाटे यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, विघ्नहर सहकारी साखर कारखाण्याचे संचालक संतोष खैरे, वारुळवाडी सरपंच राजेंद्र मेहेर, अमित बेनके, माजी उपसरपंच आशिष माळवदकर, आरिफ आतार, राजेश बाप्ते, संतोष दांगट, संतोष पाटे, गणेश पाटे, मुक्ताई देवस्थान चे विकास तोडकरी, गणेश वाजगे, अतुल आहेर आदी उपस्थित होते.

हे पहा ! पीक विमा प्रश्नी पुणे कृषी आयुक्त कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय