Tuesday, April 16, 2024
Homeग्रामीणजुन्नर : नारायणगाव बसस्थानकात अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

जुन्नर : नारायणगाव बसस्थानकात अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

एसटी प्रशासन व जुन्नर ग्रामीण रुग्णालय यांचा दुर्लक्षित हलगर्जीपणा ? 

जुन्नर : नारायणगाव एसटी स्टँडवर दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी ११ वाजता एक बेवारस व अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

या व्यक्तींच्या मृत्यूस एसटी प्रशासन व ग्रामीण रुग्णालय यांचा दुर्लक्षित हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी केला आहे.

हेही वाचा ! जुन्नर : ग्रामपंचायत आंबे – पिंपरवाडी येथे पेसा व वन हक्क मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !

सविस्तर वृत्त असे की, सदर व्यक्ती आठ दिवस जुन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या दवाखान्याच्या कपड्यामध्ये नारायणगाव एसटी स्टँडवर पडून होती. त्यांच्या छातीजवळ पोटाच्या मध्यभागी एक गाठ होती ती फुटल्याने प्रचंड दुर्गंधी आवारात पसरलेली होती. ती व्यक्ती आठ दिवसापासून स्टैंडवर पडून होती असे तेथील प्रवाशांकडून समजले. 

काही दिवसांपूर्वी त्याला नारायणगाव येथील रुग्णवाहिकेचे चालक संजय भोर यांनी १ सप्टेंबर रोजी ऍडमिट केले होते. परंतु ती व्यक्ती ९ सप्टेंबर नंतर जुन्नर ग्रामीण रुग्णालयातून पळून गेली असे समजले. 

हेही पहा ! जुन्नर : ई – पीक पाहणी अँप वापरण्याबाबत शेतकरी अनभिज्ञ

तर पाटे म्हणाले, जुन्नर ग्रामीण रुग्णालय यांनी त्याला ससून या ठिकाणी त्वरित हलवणे गरजेचे होते, परंतु तो व्यक्ती नारायणगाव येथील बसस्थानकावर ११ दिवस बेवारस पडून राहिला. एसटी प्रशासन यांनी सुद्धा दखल घेऊन त्या व्यक्तीला लवकर दवाखान्यात हलवून उपचार केले असते तर सदर व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता. सदर व्यक्ती संगमनेर परिसरातील असल्याचे काही प्रवाशांकडून समजते. पोलीस स्टेशनने पंचनामा करून पोस्टमार्टम करण्यात आला आहे.

जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे सि.सी.टीव्ही फुटेज चेक करावे, तसेच सदर प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय