जुन्नर : नगर-कल्याण महामार्गावर वाटखळे गावाच्या हद्दीत पीकअप् व छोटा हत्ती या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक प्रवासी व छोटा हत्तीचा चालक या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १२) घडल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.
जुन्नर : ग्रामपंचायत निमगिरी येथे मनरेगा अंतर्गत नाला बांध बंधीस्तीच्या कामाला सुरुवात
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महिंद्रा पीकअप जीप (एमएच १४ ईएम २३८४) व छोटा हत्ती (एमएच १४ जेएल ५७६९) यांची नगर-कल्याण महामार्गावर वाटखळे (ता.जुन्नर) गावच्या नजिक असणाऱ्या वळणावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात छोटा हत्तीमधील प्रवासी संदीप जयसिंग सुपेकर (वय ४१, रा. नांदूर खंदर माळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हे जागीच ठार झाले. तर चालक अमर चंद्रकांत रोडे (वय २६, रा. धामणी, ता. आंबेगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
किल्ले शिवनेरीवर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; अनेक पर्यटकांना चावा, रुग्णालयात उपचार सुरू
याबाबत अधिक तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन डोळस करीत आहेत. दरम्यान या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
कल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे मार्गासाठी लागणारा आर्थिक भार राज्य सरकार उचलणार !