---Advertisement---
---Advertisement---
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील गणेशखिंड येथील रस्त्यावर ट्रकचा भीषण अपघात झाला. जुन्नरवरून मुंबई जाणारा एम. एच. १७ बी.डी. ०९११ या ट्रकचा अपघात झाला.
जुन्नरवरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकवरील ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यातच पलटी झाला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक कांदे घेऊन मुंबईकडे निघाला होता.
या ठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. गणेशखिंड येथे घडलेला हा या महिन्यातील दुसरा अपघात आहे. गेल्या आठवड्यात एका बसचा अपघात झाला होता.