Friday, April 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर : सुकाळवेढे गावामध्ये वृक्ष लागवडीला सुरुवात

जुन्नर : सुकाळवेढे गावामध्ये वृक्ष लागवडीला सुरुवात

जुन्नर : बेरोजगारांना रोजगार मिळावा, पर्यावरण संवर्धन व संगोपन, संतुलन व्हावे यासाठी ग्रामपंचायत सुकाळवेढे मध्ये रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून खड्डे खोदईच्या कामांना सुरुवात करण्यात आली.

जिल्हा परिषद पुणे, ग्रामपंचायत सुकाळवेढे यांच्या सहकार्याने आणि किसान सभा जुन्नर पुणे यांच्या पाठपुराव्याने सुकाळवेढे येथे २००० वृक्ष लागवडीसाठी रोजगार हमीचे काम सुरू झाले.

सुकाळवेढे गावच्या सरपंच सुशीला ढेंगळे यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले. गावामध्ये स्थानिक युवकांनी रोजगाराचे उपलब्ध नसल्यामुळे रोजगार हमी अंतर्गत काम मिळावे यासाठी मागणी केली होती. याचा पाठपुरावा तालुका अंमलबजावणी यंत्रणेकडे जुन्नर तालुका किसान सभेने केल्यावर ही कामे सुरू झाल्याचे किसान सभेचे सुकाळवेढे शाखेचे पोपट ढेंगळे अध्यक्ष यांनी सांगितले.

रोजगार हमीची कामे सुरू झाल्याने आम्हाला गाव सोडून इतरत्र रोजगारासाठी जावे लागणार नाही. गावातील कुटुंबांची रोजगारासाठी होणारी हेळसांड थांबेल. कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील. गावात काम सुरू झाल्यामुळे गावाचा विकास होईल, असेही रामदास शेळकंदे यांनी सांगितले.

हळूहळू कमी होणारी निसर्ग आणि वृक्षसंपदा नवीन वृक्ष लावल्यामुळे वाढेल. पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल. त्यामुळे हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. पुणे जिल्हा परिषद आणि सुकाळवेढे ग्रामपंचायत ने ही कामे चालू केली. 

रोजगार हमी योजने बाबत जुन्नर तालुका किसान सभेच्या पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केल्यामुळे या सर्वांचे आभार किसान सभेचे शाखा सचिव अनिल ढेंगळे यांनी मानले. यावेळी किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी, आंबे गावचे सरपंच मुकुंद घोडे, ग्रामसेवक रविंद्र मुठे, किसान सभेचे सदस्य संदीप शेळकंदे, पुनाजी ढेंगळे, देवराम ढेंगळे, धोंडू पोटे, ज्ञानेश्वर ढेंगळे, दत्तात्रय ढेंगळे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय