Thursday, February 6, 2025

जुन्नर : पर्यटकांची तुफान गर्दी, पोलीस प्रशासनाने दंड वसूल करत केली कारवाई

जुन्नर : नाणेघाट (ता. जुन्नर) येथे पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. यामुळे पोलीस प्रशासनाने दंड वसूल करत पर्यटकांवर कारवाई केली आहे. सध्या शनिवार व रविवारी तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे नाणेघाटात होणाऱ्या गर्दीवर पोलिसांना कारवाईचा बडगा उचलावा लागला.

शनिवारी ( ता .१३ ) रोजी केलेल्या विनाकारण फिरणाऱ्या ४९ जणांवर केलेल्या कारवाईत २४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई दररोज अशीच सुरू राहणार असल्याचेही पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

या कारवाईमध्ये मास्क न वापरणाऱ्या पाच जणांकडून एक हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. नियम मोडणाऱ्या आठ दुकाने व तत्सम व्यक्तीवर कारवाई करून असा एकूण ६२ व्यक्तीकडून ३४ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे. पावसाळ्यामध्ये तालुक्यातील नाणेघाट, माळशेज घाट आणि गडकिल्लांवर पर्यटकांची तोबा गर्दी होत असते. कोरोनामुळे निसर्गाची अस्वाद गेल्या एक वर्षापासून थांबले आहे. परंतु महाराष्ट्र अनलॉक केल्यानंतर आता पर्यटनाला चालना मिळताना दिसत आहे.

दरवर्षीपेक्षा लवकर सुरु झालेला पाऊस, धुक्याची दुलई होत आहे. ओढे – नाले अजूनही तितकेसे वाहत नसले तरी पर्यटकांना आणि नागरिकांना हिरवी मशाल पांघरलेला प्रदेश आकर्षित करत आहे.

दुचाकी, चारचाकी वाहनातून युवक तसेच कौटूंबिक सदस्य येथे सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी, सहलीसाठी येत आहेत. यामुळे नाणेघाट वाहनांच्या व पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कोरोना अजून गेला नाही, लॉकडाऊन कायम आहे. पर्यटन स्थळे बंद आहेत यामुळे लोकहो पर्यटन व कौटुंबिक सहली थांबवा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles