नारायणगाव / रवींद्र कोल्हे : “संयुक्त राष्ट्र संघाने सन १९४५ ला १६ ऑक्टोबर हा दिवस” “जागतिक अन्न दिन” साजरा करण्याची घोषणा केली. मात्र असं असलं तरी केवळ घोषणा करून, संयुक्त राष्ट्र संघ” थांबला नाही तर संपूर्ण आशिया खंडात याचा प्रसार करून सन २०३० पर्यंत जगात कुणीही भुकेला राहणार नाही. यासाठी “युएनए” कडून (Zero Hungre) ही योजना राबविण्यात येणार आहे.
संपूर्ण जग भूक मुक्त करण्याचे उद्दिष्ठ संयुक्त राष्ट्र संघाने ठेवले आहे, तसे ध्येय त्यांनी बाळगले आहे. हाच धागा नारायणगाव सरपंच योगेश पाटे यांनी ठेवले आणि प्रत्येकाने किमान आपले गांव जरी भूक मुक्त केले तरी संपूर्ण जगात कुणीही भुकेला राहणार नाही. सध्या जगभरात सहा कोटी लोक उपासमारीने मृत्यू होत आहे. भारतात दरवर्षी २५ लाख लोकांना पुरेसे अन्न न मिळाल्याने “मृत्यूला कवटाळावे लागत आहेत.