Saturday, May 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नर : गोद्रे येथील वाहुन गेलेला व्यक्ती सुखरूप बचावला 

जुन्नर : राज्यभरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. जुन्नर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू असून नद्या नाले ओसंडून वाहत आहे. अशात गोद्रे येथील एक व्यक्ती वाहुन गेल्याची घटना घडली होती, वाहुन गेलेली व्यक्ती सुखरूप बचावल्याची माहिती समोर येत आहे.

---Advertisement---

मिळालेल्या माहितीनुसार, गोद्रे येथील ओढ्याला पुर येऊन एक व्यक्ती वाहुन गेली होती. ओढ्यातून रस्ता ओलांडत असताना पाण्याच्या रेट्यामुळे ही व्यक्ती वाहुन गेली होती. ओढ्यात वाहुन जात असताना काही अंतरावर गेल्यावर या व्यक्तीच्या हातात झाडाची फांदी आल्याने त्याच्या सहाय्याने ते सुखरूप बचावले. एकनाथ सोपान रेंगडे (वय ३५) असे या व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी या ओढ्यावरील पुल मंजूर होऊन या पुलाचे भुमी पुजन करण्यात आले होते. मात्र या पुलाचे काम न झाल्याने नागरिकांना या ओढ्यातूनच रस्ता ओलांडावा लागत होता.

---Advertisement---

Related Articles

- Advertisement -

Latest Articles