Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणवंचित बहुजन आघाडीची जुन्नर तालुका कार्यकारिणी जाहीर !

वंचित बहुजन आघाडीची जुन्नर तालुका कार्यकारिणी जाहीर !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर / शिवाजी लोखंडे : वंचित बहुजन आघाडीची जुन्नर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी नारायणगाव येथील जुबेर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंचितचे पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव यांनी १८ जणांच्या तालुका कार्यकारणीची घोषणा केली.

हेही वाचा ! जुन्नर : पंचायत समितीचा गुणवंत ‘शिक्षक पुरस्कार’ चालू करा – शिक्षक समितीची मागणी

नवनिर्वाचित अध्यक्ष जुबेर शेख म्हणाले, 

“जुन्नर तालुक्यात गाव तेथे शाखा स्थापन करुन, तळागाळातील शोषित, वंचित घटकांपर्यंत सत्तेच्या चाव्या हाती याव्यात यासाठी प्रयत्न करुन बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करणार असल्याचे, तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आदी निवडणूका स्वबळावर लढविणार असल्याचे शेख यांनी सांगितले”.

धक्कादायक : नारायणगाव येथे कचऱ्यात आढळला शस्रक्रिया केलेल्या रुग्णाचा पाय, “डॉक्टर आणि आया” यांचेवर गुन्हा दाखल

जुन्नर तालुका नवनियुक्त कार्यकारीणी पुढीलप्रमाणे : 

अध्यक्षपदी जुबेर अस्लम शेख, उपाध्यक्षपदी फिरोज पटेल, संतोष डोळस, विशाल रोकडे, महासचिवपदी महेश तपासे, सागर जगताप, सचिवपदी अल्पेश सोनवणे, श्रीकांत कसबे, सहसचिवपदी विनायक रणदिवे, आरीफ पटेल, प्रसिद्धी प्रमुख संदेश वाव्हळ, संघटकपदी नितीन साळवे, अशोक डोके, सुरेश आल्हाट, शांताराम घोडे, मंदार कोळंबे, नवनाथ सोनवणे, मुबारक जमादार.

हेही वाचा ! २४ सप्टेंबर : योजना कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय