Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : युवकांच्या तत्परतेने ढिगाऱ्याखालील कुटूंबाला वाचवण्यात यश !

जुन्नर : युवकांच्या तत्परतेने ढिगाऱ्याखालील कुटूंबाला वाचवण्यात यश !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर / आनंद कांबळे : भिंत अंगावर पडूनही युवकांच्या तत्परतेने एकाच  कुटुंबातील ६ ही सदस्य आश्चर्यकारक रित्या वाचले आहेत. रविवार पेठ येथील ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिराजवळ काल रात्री अंदाजे साडे आठ नंतर ही घटना घडली.

हे वाचा ! मुलांच्या शाही लग्न सोहळ्यात तुफान गर्दी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान सदस्यांवर गुन्हा दाखल

जेवण झाल्यानंतर कुटुंबिय विनीत सहानी वय ४०, शोभा सहानी वय ३५, प्रतिक्षावय ११, श्रेया वय १०, श्वेता वय ५, विवेक १८ महिने  ( सर्वजण रा. संत कबीरनगर, उत्तरप्रदेश) निवांत बसले असता सदर कुटूंबीयांवर भिंत कोसळून सर्व कुटुंब भिंतीखाली गाडले गेले. विनीत सहानी पेंटर म्हणून जुन्नर मध्ये काम करत आहेत.

हे पण पहा ! जुन्नर : देवळे येथे मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी किसान सभेचा महिला बचतगटांशी संवाद !

भिंत कोसळल्याचा आवाज ऐकून सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश जोगळेकर, अरुण शिंदे, अनिल सावंत , व्यावसायिक बंडू कर्पे, मिलिंद झगडे, अभय पाठक, भागेश गाडेकर, महेश घोडेकर, हर्षवर्धन कुर्हे, मंदार ढोबळे तसेच रविवार पेठेतील इतर युवक कार्यकर्ते यांनी त्वरित मातीचा ढिगारा बाजूला करून सदर कुटुंबाला बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे हलविण्यात आले.

निधनवार्ता : ज्येष्ठ लेखक, नाटककार जयंत पवार यांचे निधन

युवकांनी दाखवलेल्या तत्परतेचे जुन्नर परिसरामध्ये कौतुक होत आहे. हे कुटुंब परप्रांतीय असून उदरनिर्वाह साठी ५ ते ६ वर्षांपासून याठिकाणी राहत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय