नारायणगाव / रवींद्र कोल्हे : नारायणगाव रोटरी क्लब च्या वतीने नारायणगाव पोलिस ठाण्यात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. नारायणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस बांधवांना राखी बांधून व औक्षण करून व पेढे भरवून अनोख्या पद्धतीने रक्षा बंधन सण साजरा करण्यात आला.
समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहून सर्वसामान्य नागरिकांना आधार देणाऱ्या पोलिस बांधवांचे कार्य खरोखरीच स्तुत्य असल्याचे मत रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष मंगेश मेहेर यांनी व्यक्त केले.
यावेळी नारायणगाव पोलिस स्टेशनचे नव्यानेच रूजू झालेले पोलिस निरीक्षक विलास देशपांडे व सर्व पोलिस बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष मंगेश मेहेर, पोलिस निरीक्षक विलास देशपांडे, माजी अध्यक्ष सचिन घोडेकर व माऊली लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी निर्मला मेहेर, गिता डोके, रेखा ब्रह्मे, प्रिया घोडेकर, अमृता भिडे, डॉ.केतकी काचळे, छाया गायकवाड, रिनाली वामन, मंजुश्री लोखंडे, सिमा महाजन, प्रिया कामत व रोटरी क्लब नारायणगावचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी संदिप गांधी यांनी तर सूत्रसंचलन प्रा. डॉ.लहू गायकवाड यांनी केले.तर आभार राजेंद्र बोरा यांनी मानले.