Friday, April 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर : संगणक परिचालकांचे पंचायत समिती कार्यालयासमोर निषेध आंदोलन

जुन्नर : संगणक परिचालकांचे पंचायत समिती कार्यालयासमोर निषेध आंदोलन

जुन्नर : आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या जुन्नर शाखेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर केला

या संदर्भात बोलताना संघटनेचे तालुका अध्यक्ष जयसिंग भोजने म्हणाले, जुन्नर पंचायत समिती मध्ये ऑपरेटर पद भरण्यासाठी संघटनेच्या वतीने अनुभव व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी पाठपुरावा चालू होता. संगणक परिचालक संघटनेतील अनुभवी व्यक्तीची नियुक्ती केली जाईल, असेही आश्वासन दिले होते. संघटनेने राहुल बापू लोखंडे यांचे नाव सुचवून कागदपत्रांची पूर्तता केली होती. परंतु तालुका व्यवस्थापकाने अनुभवी व्यक्तीची निवड टाळून नवीन व्यक्तीची नियुक्ती केली आहे.

या विरोधात संगणक परिचालक आक्रमक झाले असून राहुल बापू लोखंडे यांची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनात सचिव संदिप उघडे, कार्याध्यक्ष पंढरीनाथ सरोगदे, महिला अध्यक्ष अल्पना पानसरे, गौरी सरजीने, आशा जेडगुले, संतोष कांबळे, सचिन कुमकर आदींसह मोठ्या संख्येने संगणक परिचालक सहभागी झाले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय