जुन्नर / आनंद कांबळे : ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सोमवारी (दि.11) शाळा तयारी अभियानांतर्गत शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्याचे शालेय आवारात स्वागत करण्यात आले. तसेच सर्व नवागतांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. पूर्व तयारी मध्ये विविध पोस्टर, फुगे लावून शाळा परिसर सजविण्यात आला होता. प्रसन्न वातावरणात दाखल विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. तद्नंतर नियोजनाप्रमाणे या मुलांचे विकास पत्र भरुन घेण्यात आले.
पुणे : जुन्नर मध्ये हंडाभर पाण्यासाठी आजही भटकंतीच, तेही पिण्याअयोग्य पाणी…
माणिकडोह धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक, कमी पाणीसाठा असलेल्या माणिकडोह धरणांतूनच पाणीउपसा का?
विकास पत्रातील शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास व गणनपूर्व तयारी या अनुषंगाने विविध साधनांच्या साहाय्याने मुलांच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाची रूपरेषा सचिन नांगरे यांनी स्पष्ट केली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर दुधवडे, मुख्याध्यापक ए.के. मांडवे, पदवीधर शिक्षक तानाजी तळपे, उपशिक्षक मोहन उंडे, अंगणवाडी सेविका कुंता तुरे, मदतनीस विमल केदार व दाखल पात्र विद्यार्थी यांचे पालक सहभागी झाले होते.
जुन्नर : महावितरण चे वायरमन व कंत्राटी कर्मचारी यांच्या ‘फ्री स्टाईल’ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल !
जुन्नर : घाटघर येथे रात्री भरला रोजगार मेळावा