Sunday, December 8, 2024
Homeजुन्नरजुन्नर : पश्चिम आदिवासी भागात दरड कोसळल्या, भातशेतीचे मोठे नुकसान

जुन्नर : पश्चिम आदिवासी भागात दरड कोसळल्या, भातशेतीचे मोठे नुकसान

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील हडसर गावातील कोटमवाडी येथे काल दुपारी बुधला या डोंगरावरुन दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामध्ये अशोक शेळके व गोविंद शेळके या शेतकऱ्यांची भात खाचरे मलब्या खाली गाडली आहे. तहसीलदारांनी कामगार तलाठी यांनी पंचनामे करण्यास सांगून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

तळेरान येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन

सततच्या मुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील तळेरान (ता. जुन्नर) येथे भूस्खलन झाल्याची घटना आज घडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ गोविंद साबळे यांनी सांगितली. येथून जवळच असलेल्या वनगया व आदमनी डोंगरांच्यामध्ये असणाऱ्या घळीचे सुमारे २०० फूट भूस्खलन झाले. वाहत्या पाण्याबरोबर माती, दगड वाहत येऊन सुमारे दीड किलोमीटर अंतरापर्यंत आले.

संबंधित लेख

लोकप्रिय