Friday, December 6, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर : मागील २४ तासात २७२ कोरोना रुग्णांपैकी एका ४ वर्षाच्या मुलासह...

जुन्नर : मागील २४ तासात २७२ कोरोना रुग्णांपैकी एका ४ वर्षाच्या मुलासह १८ वर्षाखालील ४५ मुलांना कोरोनाची लागण

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे, कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट जास्तच घातक ठरत आहे. दररोज आढळून येणाऱ्या या आकड्यांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

काल (ता. २१) च्या कोरोना रुग्णांच्या एकूण २७२ च्या आकडेवारीमधील सहा वर्षाखालील ७ मुलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते त्यामध्ये एका चार वर्षाच्या मुलाचा देखील समावेश होता. तर सात ते चौदा या वयोगटातील २५ मुले होते तर पंधरा ते अठरा या वयोगटातील १३ मुलांचा समावेश होता. एकूण २७२ कोरोना रुग्णांपैकी ४५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, देशभरात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र ६० वर्षावरील ३३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.

संबंधित लेख

लोकप्रिय