जुन्नर : दिवंगत माजी सरपंच सखाराम मारुती लांडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त केवाडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोफत महाआरोग्य शिबीर आणि करोना प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांचे वडील सखाराम लांडे यांचा २६ ऑक्टोबर रोजी पाचवा स्मृती दिन आहे, सखाराम लांडे हे केवाडी या गावचे सरपंच होते, तसेच ते पैलवान देखील होते. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त केवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबीर आणि कोव्हिडं लसीकरण करण्यात येणार आहे.
तसेच, भजन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी एकूण २२ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या भजन स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १० हजार, द्वितीय ७ हजार तर तृतीय ५ हजार रुपये असे बक्षीस विजेत्यांना देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अमोल लांडे यांनी दिली. तसेच नागरिकांनी महाआरोग्य शिबिरात सहभाग घेण्याचे आवाहन लांडे यांनी केले.