Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : कार झाडावर आदळून अपघात एक ठार तर एकजण जखमी

जुन्नर : कार झाडावर आदळून अपघात एक ठार तर एकजण जखमी

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पिंपळवंडी : नगर कल्याण महामार्गावर वडगाव आनंद जवळ मारूती सुझुकी कार झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी ( दि १) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पिंपरी पेंढार ( ता. जुन्नर) येथील अल्पेश रफीक मोमीन ( वय २२ वर्ष) व जावेद यूनूस शेख हे दोघेजण बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मारूती सुझुकी ( क्र एम एच ०१ एम ई ३५५०) मधून नगर कल्याण महामार्गावरुन जात असताना काल दिवसभर झालेल्या पावसामुळे त्यांची कार स्लिप झाली व या कारची महामार्गाच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

या अपघातामध्ये अल्पेश रफीक मोमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर जावेद यूनूस शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची फिर्याद मोसिन अहमद हुसेन सय्यद ( रा. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर, जि. पुणे )  यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस एन. टी. गायकवाड करत आहेत.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय