जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे, आज तालुक्यात ९९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३९ झाली आहे.
आज खोडद १२, ओतूर ९, निमगावसावा ७, हिवरे तर्फे नारायणगाव ५, नारायणगाव ५, ओझर ५, रोहकडी ५, आळे ४, गुंजाळवाडी बेल्हे ४, खानगाव ३, पाचघर ३, पिंपरी पेंढार २, निरगुडे २, हिवरे खु २, काळवाडी २, बोरी बु २, वडगांव आनंद १, बेल्हे १, यादववाडी १, गुळूंचवाडी १, बांगरवाडी १, सोनावळे १, मंगरूळ १, बोरी खु १, आर्वी १, धोलवड १, उंब्रज नं १- १, नगदवाडी १, धामणखेल शिरोली खु १, जुन्नर नगरपरिषद १३ असे एकूण ९९ रुग्ण आढळले आहेत.