Monday, December 9, 2024
Homeग्रामीणजुन्नर : सलुन व पार्लर दुकानांना घातलेली बंदी उठविण्याची नाभिक संघाची मागणी

जुन्नर : सलुन व पार्लर दुकानांना घातलेली बंदी उठविण्याची नाभिक संघाची मागणी

जुन्नर (पुणे) : सलुन व पार्लर दुकानांना घातलेली बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी जुन्नर तालुका नाभिक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठवून करण्यात आली.

निवेदनात. म्हटले आहे की, पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार सलुन व पार्लर हे ३० एप्रिल, २०२१ पर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहे. आमचा नाभिक समाज हा ९ ० % भुमिहिन १० % अल्पभुधारक आहे व सर्वच समाजाची उपजिविका ही सलुन व पार्लर या व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु या आदेशामुळे संपुर्ण नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. 

गेल्या वर्षी सुध्दा सरासरी ५ महिने सलुन व्यवसाय बंद होता. त्यामुळे समाजातील १७ हुन अधिक व्यवसायीकांनी कर्जबाजारीपणामुळे भीषण उपासमारीने आत्महत्या केलेल्या आहेत. मागील लॉकडाऊनमुळे सलुन व्यवसायिक हे कर्जबाजारी झाले आहेत ते अजुनही यातुन सावरलेले नाहीत. त्याकाळात संपुर्ण नाभिक समाजास कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत, दुकानभाडे, लाईटबोल माफी, मुलांची शाळा कॉलेज फि माफ करण्यात आलेली नाही. आता लगेच दुसरा लॉकडाऊन आपणाकडुन लावण्यात आल्यामुळे सलुन व्यवसायीकांवर अन्याय होत आहे. 

नाभिक संघाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

१. सर्व नाभिक व्यवसायीकांना रु .२०,००० / – दरमहा पॅकेज द्यावे. 

२. मुलांना शाळा / कॉलेज शुल्क माफ करण्यात यावी.

३. वीजबिल माफ करण्यात यावे.

४. घरभाडे, दुकानाचे भाडे व घरपट्टी हे माफ करण्यात यावी.

वरील मागण्यांवर २ दिवसात सलुन व्यवसाय सुरु करण्याची परवानगी न मिळाल्यास सहकुटुंब तहसिलदार कचेरी, जुन्नर येथे शासनाने घालुन दिलेल्या सोशल डिस्टसिंग व मास्क वापरुन धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

निवेदन देतेवेळी जुन्नर तालुका नाभिक महासंघाचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, उपाध्यक्ष सचिन कालेकर, जुन्नर शहर सलून दुकानदार संघटना अध्यक्ष सचिन डाके, नाभिक समाज जेष्ठ नेते नानासाहेब कदम, वैभव शिंदे, युवराज शिंदे, उस्मान शेख, प्रकाश बोऱ्हाडे हे उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय